VIDEO: शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं नाही? Devendra Fadnavis यांचा सवाल

Devendra Fadnavis Criticized MVA Sharad Pawar Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवारांना सवाल केलाय. त्यांनी दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन केलंय.

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तर शरद पवार चारवेळेस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आरक्षण का नाही दिलं? असं म्हणत फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच सवाल केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत आरक्षण देण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तुमचं समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तसंच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय. पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com