Honey Trap: ना हनी, ना ट्रॅप; तो हॉटेल मालक काँग्रेसचाच, पेन ड्राइव्ह बॉम्बवर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर | VIDEO

Maharashtra CM Reacts to Nana Patole Pen Drive Bomb: विधानसभेत फडणवीसांनी हनीट्रॅप प्रकरणावर भाष्य करत कोणत्याही मंत्र्यांकडून तक्रार नसल्याचे सांगितले.

काल पासून सभागृहात एक गोष्ट सुरु आहे. ती म्हणजे हनीट्रॅप. कोणता हनीट्रॅप यांनी आणला हेच मला समजत नाही. नाना भाऊंनी तर कुठला बॉम्ब आणला. पण तो आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. मंत्रालय आणि राज्यातील काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे गुप्तचर यंत्रणेने सांगितले आहे. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या देखील सुरू आहे. यावर आज फडणवीसांनी सभागृहात भाष्य करत स्पष्टीकरण दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, कुठली घटना घडली तर ती मांडली पाहिजे. पण वातावरण असे तयार होते के, आजी आणि माजी मंत्री म्हंटल्यावर सगळे एकमेकांकडे पाहत आहे. मात्र, कोणत्याही आजी आणि माजी मंत्र्याची हनीट्रॅपची तक्रार नाही. या संदर्भातली ती मागे पण घेतली. आणि ज्या हॉटेल मालकाचा उल्लेख करता ते कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे असा आरोप यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com