जंतर-मंतरच्या आंदोलनासाठी फंडिंग कशी आली? अभिजीत दीपकेंनी 'साम टीव्हीशी बोलताना सर्वच सांगितलं|VIDEO

Jantar Mantar Protest Funding Row: जंतर-मंतर आंदोलनाच्या फंडिंगवरून निर्माण झालेल्या वादावर अभिजीत दीपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडली. ईडी आणि सीबीआय चौकशीचे खुले आव्हान देत त्यांनी सरकारवरही पलटवार केला.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केलेल्या अभूतपूर्व Gen-Z आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. मात्र, हे आंदोलन झाल्यानंतर अनेकांनी या मोर्चाला आर्थिक रसद कोण पुरवत होते? आणि बाहेरून काही लोक फंडिंग करत होते असा आरोप केला जात आहे. यावरच अभिजीत दीपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली. ते म्हणाले जर सरकारला असं वाटत असेल की आम्हाला बाहेरून पैसे दिले गेले तर आमची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी करावी असे आव्हान त्यांनी दिले.

तसेच जर मला बाहेरून रसद पुरवली जात असेल किंवा परदेशातून मला पैसे मिळत असेल तर यासाठी सर्वात मोठं अपयश हे गृहमंत्री अमित शाह यांचं आहे. चाणक्य असताना हे असे जर होत असेल तर स्पष्टपणे हे त्यांचं अपयश आहे. असा पलटवार अभिजीत दीपके यांनी केला. तसेच आमचं सरकारसोबत कुठलंही वैयक्तिक भांडण नाहीये. उद्या दुसरे कोणाचे सरकार आलं आणि त्यांनी चुकीचं काम केलं तर आम्ही त्यांच्याही विरोधात आंदोलन करू असे अभिजीत दीपके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com