आज दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. भाजप विरुद्ध आप अशी ही चुरशीची लढाई या ठिकाणी होताना बघायला मिळत आहे. यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पहिला मोठा धक्का बसलेला बघायला मिळत आहे. आपचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला बघायला मिळत आहे. जंगपुरा मतदारसंघामधून सिसोदिया विधानसभेची निवडणूक लढवत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) हा मोठा धक्का मानला जात आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाने सत्ता गमावली असल्याचं बघायला मिळत आहे. अशातच त्यांच्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करावा लागत आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आपचे जंगपुरा मतदारसंघाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे आपला धक्का बसला आहे.
दरम्यान, परभवानंतर मनीष सिसोदिया यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच झुंज दिली; आम्ही सर्वांनी कठोर परिश्रम केले. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण, माझा ६०० मतांनी पराभव झाला. विजयी उमेदवाराचे मी अभिनंदन करतो. ते मतदारसंघासाठी काम करतील, अशी आशा आहे', असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.