Pakistan Bomb Blast: पहलगामनंतर आता पाकिस्तानमध्येही बॉम्ब स्फोट; ७ जणांचा बळी, तर 17 लोक जखमी|VIDEO

Blast in Pakistan After Pahalgam Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असताना आता पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. मात्र हा स्फोट कोणी घडवून आणला हे अद्याप समोर आले नाहीये.

पाकिस्तान येथील पख्तूनख्वा प्रांतातील शांतता समितीच्या कार्यालयात आज बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र हा बॉम्बस्फोट कोणी केला याबाबत खुलासा होऊ शकला नाहीये. तसेच कुठल्याही आतंकवादी संघटनेने ही जबाबदारी स्वीकारली नाहीये. हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये शांतता समितीच्या कार्यालयाची इमारत उद्ध्वस्त झाली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

दक्षिण वझिरीस्तन जिल्ह्यातील वाना शहर येथे हा स्फोट झाला. वाना हे कधीकाळी पाकिस्तानी तालिबानचा बालेकिल्ला होता. शांतता समिति ही तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान टीटीपीची विरोधक आहे. तसेच स्थानिक वाद सोडवण्यासाठी ही समिति काम करते. या स्फोटामागे टीटीपी असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com