Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर गर्दी, पाहा ड्रोनने टिपलेली विलोभनीय दृश्य

Raigad Fort: आज किल्ले रायगडावर शिवप्रेमींच्या उपस्थितीत अभिमानास्पद वातावरणात शिवराज्याभिषेकाचा ३५२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटामाटात साजरा केला जात आहे.

किल्ले रायगडावर आज शिवप्रेम आणि अभिमानाचा उत्सव साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा ३५२ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. ६ जून १६७४ रोजी रायगडाच्या राजसभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. याच ऐतिहासिक घटनेची स्मृती जागवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि शिस्तीने पार पडतोय.

या खास दिवशी शिवप्रेमी, शिवभक्त आणि इतिहासप्रेमींची मोठी गर्दी रायगड किल्ल्यावर उसळली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक रायगडावर दाखल झाले आहेत. संभाजी राजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याभिषेकाचा विधी पार पडणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताका फडकवतानाच, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष साऱ्या परिसरात घुमतोय.

रायगडावर सध्या जल्लोषाचे वातावरण असून, किल्ल्याच्या परिसरात पारंपरिक वेशभूषा केलेले नागरिक, शिवकालीन पोशाखातील मावळे आणि स्त्रिया, विविध सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ड्रोन कॅमेरामधून टिपलेली रायगडावरील विलोभनीय दृश्ये या सोहळ्याच्या भव्यतेची साक्ष देतात. शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे फक्त एक उत्सव नव्हे, तर स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि इतिहासाची जिवंत आठवण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com