काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे – अंबादास दानवेंचा सल्ला|VIDEO

Uddhav Thackeray camp Advice To Congress: बिहार निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या धक्क्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने स्वतःची वृत्ती आणि रणनीती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होत चालला असून कॉँग्रेसला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला असून दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल 67.13 टक्के विक्रमी मतदान झाले आणि 5 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर आता मतमोजणीला सुरुवात झाली आणि भाजपा-जेडीयू युतीला 190 पेक्षाही जास्त जागांवर आघाडी मिळाली. तर आरजेडीचा सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरच आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे. काँग्रेसने मोठ्या चुका केल्या. काँग्रेसने आपल्या पराभवातून शिकायला हवे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची उमेदवार ठरवले असते, तर परिस्थिती वेगळी असती ती चुकी बिहारमध्ये केली. भाजप ने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळं खूप उशीर झाला. असा सल्लाच अंबादास दानवे यांनी कॉँग्रेसला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com