

टिपू सुलतान वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी
विधानाचा विपर्यास झाल्याचा आरोप
भाजपवर खोडसाळपणाचा ठपका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानच्या वक्तव्यावरून शिवप्रेमींची दिलीगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. भाजपने जाणीवपूर्वक खोडसाळपणा केल्याचं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी आपल्या विधानाबाबत दिलीगिरी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. सपकाळ यांच्या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. भाजप नेते, आमदारांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. काँग्रेसचा खरा चेहरा हाच आहे, काही विशिष्ट समुदायाच्या व्होट बँकेसाठी हर्षवर्धन सपकाळ असं बोलतात अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.