Maharashtra Election : ठाकरे गट-काँग्रेसमध्ये सोलापूर दक्षिणवरून ठिणगी पेटली!

Shivsena UBT vs Congress : सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. या जागेवर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानं दावा केल्याने ठाकरे गटानं बंडखोरीचा इशारा दिला आहे.

विश्वभूषण लिमये, सोलापूर

Solapur South Assembly Constituency : सोलापूर दक्षिण मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. या मतदारसंघावरील दावा सोडला नाही तर, शिवसेना अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात बंडखोरी करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघावर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांनी दावा केला होता. त्यानंतर सोलापुरातील शिवसेना ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना एबी फॉर्म मिळाला आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा कार्यकारिणीने केला आहे. येत्या २९ तारखेला शिवसेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत, असे सांगितले जाते. या रॅलीला महाविकास आघाडीतील सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. या शक्तिप्रदर्शनावेळी साधारण ५ हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com