राज्याचा राजकरणात मोठी घडामोड! CM फडणवीस-जयंत पाटील यांचा एकत्र विमानप्रवास; सोबत विधानसभा अध्यक्षही|VIDEO

Cm Fadnavis Jayant Patil Joint Flight Maharashtra Political News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एकत्र विमानप्रवास चर्चेचा विषय ठरलाय. या प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्रित विमान प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईहून कोल्हापूरकडे प्रस्थान केले. याच विमानात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार जयंत पाटील देखील प्रवास करत होते. दरम्यान, आमदार जयंत पाटील हे त्यांच्या इस्लामपूर (ईश्वरपूर) मतदारसंघात जाण्यासाठी निघाले होते. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा एकत्रित विमान प्रवास झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या प्रवासामागे नेमके काय कारण आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या भेटीला राजकीय अर्थ लावले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com