CM Eknath Shinde : कोस्टल रोडचं काम कुठपर्यंत आलं? मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भाष्य केलं.

मुंबई :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी हाजीअली ते वरळी सी फेस किनारी रस्ता मार्गाची टप्प्याची साडे तीन किलोमीटर रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून सकाळी तातपासून हा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले. वरळी ते सी लिंक हा जोडमार्ग पुढच्या तीन आठवड्यात पूर्ण होणार, असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या मार्गामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'आज दिल्लीत मिळणारा कृषी क्षेत्रातला पुरस्कार हा राज्यासाठी गौरवाचा क्षण आहे. मी हा पुरस्कार राज्यातील बळीराजांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी कृषी क्षेत्रातील पुरस्काराविषयी दिली.

हिट अँड रन प्रकरणावर शिंदे काय म्हणाले, 'हिट अँड रन प्रकरणात राजकारण करण्याचा भागच नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांच्यावर ती करवाई होणारच आहे. पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहेत. कोणालाही पाठीशी घातला जाणार नाही. पक्षाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. पक्षातून काढून टाकण्यात आलेला आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com