संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

sanjay dina patil abuses journalists cm fadnavis reaction : खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर थेट शिवीगाळ केली. याचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले आहेत. एकनाथ शिंदेंच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले ते जाणून घेऊयात....

मुंबईतील खासदार आणि ठाकरे सेनेतून शिंदेसेनेत नुकताच प्रवेश केलेले नेते संजय दिना पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना शिवीगाळ केली. तसेच धमकावले. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन, असे ते म्हणाले. याशिवाय अर्वाच्च्य भाषाही वापरली. संजय दिना पाटील यांच्या या आक्षेपार्ह भाषेवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संजय पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी आधी माहिती घेतो नक्की काय घडलं आहे. कुणीही अशाप्रकारे कुणालाही धमकी देणे योग्य नाही. पण या घटनेबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मी आताच नागपूरहून आलो आहे. याबाबत संपूर्ण माहिती घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com