Nanded : कोचिंग क्लासमध्ये शिक्षकानेच काढली विद्यार्थिनीची छेड, संतपालेल्या नागरिकांनी केली क्लासेसची तोडफोड; पाहा व्हिडिओ

Nanded latest News : नांदेड शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडमध्ये कोचिंग क्लासमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतपालेल्या नागरिकांनी केली क्लासेसची तोडफोड केली.

नांदेड : राज्यात शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना नांदेडमध्ये देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील एका कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या नववीतील विद्यार्थिनीची कोचिंग क्लासमधीलच एका शिक्षकाने छेड काढल्याचा आरोप करत नागरिकांनी या कोचिंग क्लासेसची तोडफोड केली. या तोडफोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नांदेड शहरातील चैतन्यनगर परिसरातील हे कोचिंग क्लासेस आहे. याच कोचिंग क्लासमध्ये नववीत एक विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. दरम्यान कोचिंग क्लासमधील एका शिक्षकाने या विद्यार्थ्यांनीची छेड काढली, असा आरोप आहे. या कोचिंग क्लासमधील शिक्षकांना जाब विचारात या नागरिकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या कोचिंग क्लासेसमधील शिक्षकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाला भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षकानी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com