Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हे शब्दांचे 'कोट्यधीश'; मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिली उपाधी

CM Devendra Fadnavis Praises Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘कोट्यधीश’ अशी उपाधी दिली आहे. राजकीय मतभेद असूनही त्यांचे छायाचित्रण, सांस्कृतिक योगदान आणि अद्वितीय नेतृत्व यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानपरिषदेतील ९ आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यात संपणार आहे. त्यांच्यासाठी आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मतभेद असतात.सोबत असतो कधी संघर्ष करतो. पण यापलीकडे वेगळे नाते असते. आम्ही सहप्रवासी राहिलो आहोत. त्यांचा स्वभावात राजकारण कमी आहे. स्वभाव राजकारणी नाही. एकदा ठरवले की निर्णय घ्यायचा असा त्यांचा स्वभाव आहे. ते छायाचित्रकार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध छटा त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. हे छायाचित्रण नव्हे तर संस्कृती जपण्याचे काम त्यांनी केले. वारीचे छायाचित्र काढताना रिस्क घेवून हेलिकॅाप्टरमधून त्यांनी केले. २०१० नंतर आमची जवळीक आली. मैत्रीची भावना निर्माण झाली, आताही आहे, पण राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राजकीय परिणामांची पर्वा न करता निर्णय घेतले. सामान्य माणसालाही राजकीय चेहरा देण्याचा गुण त्यांनी जपला. पु.ल. यांचच्या नंतर शब्दांचे कोट्यधीश ही पदवी त्यांनाच द्यावी लागेल.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com