OBC Reservation News: आंदोलन पेटलं! आंदोलकांना सबुरीने घेण्याचा भुजबळांचा सल्ला

Chhagan Bhujbal Call To OBC Protesters Video: बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांच रास्ता रोको आंदोलन चालू होतं त्यादरम्यान भुजबळांनी फोन करुन आंदोलकांशी संपर्क साधत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

बीड जिल्ह्यातील हातोला येते ओबीसी कार्यकर्त्यांचे रास्ता रोको आंदोलन चालू होतं. त्यादरम्यान छगन भुजबळांनी फोन करून आंदोलकांशी संपर्क साधला आहे. छगन भुजबळ आंदोलनकर्त्यांना म्हणाले की, आपण वेळ आली तर कोर्टात जाणार आहोत .... रास्ता रोको आंदोलन मागे घ्या.... आज सरकारसोबत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात हे पाहूया. असं आवाहन देखील छगन भुजबळांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. तसेच लक्ष्मण हाके यांनासुद्धा उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. आमचा जीव गेला तरी चालेल,आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असू, असा देखील शब्द भुजबळांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com