बापरे! एका छोट्याशा घरात तब्बल 119 मतदार; निवडणूक आयोगावर पुन्हा प्रश्नचिन्ह? पाहा, VIDEO

119 Voters Registered At One House In Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावात एका लहानशा घरात तब्बल 119 मतदारांची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने हा गंभीर घोटाळा उघड करत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Summary

घुग्गुस गावातील 350 क्रमांकाच्या घरात प्रत्यक्षात फक्त दोनच रहिवासी.

मतदार यादीत त्याच पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद.

काँग्रेसने निवडणूक आयोगावर गंभीर अनियमिततेचा आरोप केला.

प्रकरणामुळे गावात आणि राजकारणात खळबळ उडाली.

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस गावात मतदार यादीत मोठा घोटाळा झाल्याचा काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. गावातील सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर प्रत्यक्षात लहान असून, येथे केवळ दोनच मतदार राहतात. मात्र, निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत या घराच्या पत्त्यावर तब्बल 119 मतदारांची नोंद असल्याचे काँग्रेसने सांगितले.

काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार पडताळणी केली असता हा प्रकार उघड झाला. एका लहान घरात एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी कशी झाली, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. या घोटाळ्यामुळे गावात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com