Chandrakant Khaire News | कडू झालेल्या राजकारणाला रामनवमीचा गोडवा! खैरे-शिरसाट यांच्या भेटीची का होतेय चर्चा?

Chandrakant Khaire News | ठाकरेंच्या शिलेदाराने भरवला शिंदेंच्या आमदाराला पेढा, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण..

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. अशातच लोकसभा निवणुकांचं देशात रणशिंग फुंकलं गेलंय. यावरुन आरोप प्रत्यारोप जोरदार पहायला मिळतायेत. पण, निवडणुकीच्या या तापलेल्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना पेढा भरवलाय. हे दोघेही नेते रामनवमी निमित्त एकत्र आले होते. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना पेढा भरवला. चंद्रकांत खैरेंनी भरवलेल्या या पेढ्यावरुन राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com