Badlapur News : एन्काउंटरनंतर बदलापूरमध्ये जल्लोष !

Akshay Shinde Encounter : चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर बदलापुरमधील नागरिकांनी एकच जल्लोष केला.

अक्षय शिंदेचा एन्काउंटरनंतर मंगळवारी सकाळी बदलापूरमध्ये ज्या शाळेत चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. त्याच शाळेबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत यावेळी शिवसेनेच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर बदलापुरमधील नागरिकांनी एकच जल्लोष केला. अक्षयच्या एन्काउंटरनंतर बदलापुरमध्ये महिलांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. तर बदलापूर रेल्वे स्थानकावर बॅनर झळकावत जल्लोष करण्यात आला. 'नराधमाला शिक्षा मिळालीच', 'नराधम मेला आत्मा शांत झाला', 'एकनाथ...एक न्याय बलात्काराला थारा नाय 'अशा आशयाचे बॅनर झळकावण्यात आले. अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर त्याला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या अशी मागणी बदलापुरच्या नागरिकांनी केली होती. यासाठी त्यांनी रेलरोको आणि रास्तारोको आंदोलन देखील केलं होतं. अखेर पीडित मुलींना न्याय मिळाला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com