CBSE Board Exam News Today: सीबीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एकाच वर्षी 2 बोर्ड परीक्षा?

CBSEBoard Exam News: पुढील वर्षापासून सीबीएससी दोन बोर्ड परीक्षा घेण्याच्या विचारात असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे.

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुढील वर्षापासून सीबीएसई 2 बोर्ड परीक्षा घेण्याच्या विचारात असल्याचं वृत्त सूत्रांनी दिलं आहे. शिक्षण मंत्रालयाकडून तसा पद्धतीने विचार केला जात असून याची अंमलबजावणी कशी करता येऊ शकेल, याची चाचपणी केली जात असल्याचं सांगितलं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 च्या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई दोन बोर्ड परीक्षा घेण्याबाबतच्या सूचना लागू करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी शिक्षण मंत्रालयाकडून याबाबतची चाचपणी केली जात असल्याचं समोर आलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com