Burning Car Video : भररस्त्यात बर्निंग कारचा थरार, बघता बघता डोळ्यांसमोर जळून खाक

Vashi Burning Car Video : नवी मुंबईतील वाशीमध्ये भररस्त्यात कार जळून खाक झाली. या घटनेमुळं काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

विकास मिरगणे, नवी मुंबई | साम टीव्ही

burning car incident in vashi navi mumbai : नवी मुंबईतील वाशी येथे भररस्त्यात कारला आग लागली. या आगीत कार जळून खाक झाली आहे. या घटनेमुळं खळबळ उडाली होती. काही वेळ रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको ऑडिटोरियम हॉलच्या समोरील रस्त्यावर कारला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. या आगीत कार जळून खाक झाली. अचानक लागलेल्या आगीमुळं धावपळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाने ही आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत कार संपूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीच्या घटनेमुळं दोन्ही दिशेकडील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com