देशाच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मित्रपक्षांशी चर्चा केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
एनडीएमधील घटक पक्षांना सरकारमध्ये अधिक प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही मित्रपक्षांच्या नेत्यांना केंद्रात, तर काहींना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या संभाव्य फेरबदलात केवळ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार नाही, तर सध्या मंत्रिपदावर असलेल्या काही नेत्यांची जबाबदारीही बदलली जाऊ शकते. केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जागी नव्या नेत्यांना संधी मिळू शकते. या पार्श्वभूमीवर कोणाला मंत्रिपद मिळणार आणि कोणाची जबाबदारी कमी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.