कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रेंना मोठा दणका दिलाय. न्यायालयाने त्यांना मंजूर झालेला जामीन रद्द केला आहे. त्यांना उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले आहेत. निर्धारित मुदतीत शरण न गेल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीचे डॉक्टर बंदमध्ये होणार सहभागी
डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ येत्या सोमवारी २४ तासांसाठी राज्यस्तरीय बंदची हाक देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदेसेनेचा नगरसेवक आणि समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने २० जुलैला 24 तासांसाठी राज्यस्तरीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याचे आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी सांगितले. मात्र, आता न्यायालयाने डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.