Ambernath News: अंबरनाथमध्ये गॅस सिलिंडरचा काळा बाजार, अनधिकृतस कारखान्यावर पोलिसांची कारवाई

Ambernath Gas Cylinder : पोलिसांनी एका अनधिकृत कारखान्यावर धाड टाकत गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचा भांडाफोड केला.

अंबरनाथमध्ये गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत असल्याची बाब उघडकीस आलीय. पोलिसांना या अनधिकृत कारखान्यावर कारवाई केलीय. अंबरनाथ एमआयडीसीतील भोनई गावाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता. अत्यंत धोकायदायक परिस्थिती सिलिंडर रिफिलिंग केलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा काळाबाजार येथे सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी कारखान्यावर धाड टाकत या अनधिकृत कारखान्याचा पदार्फाश केलाय. या धाडीत पोलिसांनी ५०० च्या वरती भारत गॅस आणि एचपी, गो गॅसचे सिलिंडर येथे आढळून आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com