गद्दार म्हणाल्या, हातात चपला घेतल्या; उपनगराध्यक्षपदावरून अंबरनाथमध्ये शिंदेसेना-भाजपमध्ये राडा, VIDEO

deputy chairperson post in municipal council ambernath : अंबरनाथच्या उपनगराध्यक्षपदावरून आज, सोमवारी भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात जोरदार राडा झाला. महिलांनी हातात चपला घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक झाल्यानंतरही तिथल्या घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलंय. अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर सत्तेचा पेच कायम राहिला. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्या १२ नगरसेवकांना निलंबित केले होते. त्यानंतर या नवनिर्वाचित नगरसेवकांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला. यावरून भाजपवर विरोधकांकडून टीका झाली होती. दुसरीकडं शिंदेसेनेने भाजपला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी डाव टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ करून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

आता उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून, या निवडणुकीआधीच भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने आले. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाटील हे गद्दार आहेत, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हातात चपला घेऊन रोषही व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com