BJP victory in Nanded mayor and deputy mayor election analysis : नांदेड महापालिकेत भाजपच्या कविता मुळे यांची नांदेडच्या महापौरपदी अधिकृत निवड झालीय.... तर, उपमहापौरपदी भाजपचे अनुभवी नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी बाजी मारलीय. आज झालेल्या विशेष सभेमध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रत्येकी 50 मते मिळवून स्पष्ट बहुमत सिद्ध केले. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला केवळ 15 मतांवर समाधान मानावे लागले, तर एमआयएमला 14 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला.
महापौरपदाच्या निवडणुकीनंतर राडा
नांदेड महापालिकेच्या महपौरपदाची निवडणुक झाल्यानंतर, एमआयएमचे नगरसेवक सभागृहातून बाहेर आले. पालिका इमारतीखाली मोठया संख्येने भाजपा कार्यकर्ते उभे होतें. हिरवे फेटे बांधून आलेले एमआयएमचे नगरसेवक आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्हीं गटाकडून घोषणाबाजी सरू करण्यात आली.भाजपा कडून जय श्री राम आणि मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. एमआयएम कडून नारा ए तकबीर , अल्लाह हु अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करुन एमआयएमच्या नगरसेवकाना इमारती बाहेर नेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.