Narendra Mehta: मंत्रिपदाची कोणतीही इच्छा नाही, जनतेचा विश्वास सार्थकी लावणार- नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया
जनतेने हा मोठा विश्वास दाखवला आहे. याचअनुषंगाने जनतेच्या प्रश्नांना योग्य तो न्याय देणार असल्याचं नवनिर्वाचित आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलं आहे.
मिरा भाईंदर मतदारसंघातून महायुतीचे नरेंद्र मेहता हे मोठ्या मताधिक्यानं आमदार म्हणून निवडून आले आहेत. नरेंद्र मेहता यांनी अपक्ष उमेदवार गीता जैन यांचा पराभव केला आहे. गीता जैन या २०१९ च्या आमदार होत्या. २०२४ ची मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात भाजपचे नरेंद्र मेहता यांचा विजय झाला आहे. याचनिमित्ताने नरेंद्र मेहता यांनी साम टिव्हीला प्रतिक्रिया दिली आहे.
नरेंद्र मेहता म्हणाले की, "अभिनंदन जनतेचं आहे. गेली सहा महिन्यांपासून रोज धावपळ होत होती याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला आहे. मात्र यापुढे अधिक जोमाने काम करायचे आहे. असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी कितीही वाटलं आपण जिंकणार आहोत, तरी कुठेतरी दडपण हे येतच होतं. जनतेने दाखविलेला विश्वास, त्यांना योग्य तो न्याय देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे."
पुढे त्यांनी, "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे अशी माझी इच्छा आहे. मिरा भाईदर हे शहर प्रगतीप्रथावर नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. मिरा भाईंदरवर त्याचे विशेष प्रेम आहे. जनतेने आशीर्वाद दिले आहेत जनतेचा हा विश्वास सार्थकी लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.