भाजप आमदारानं भररस्त्यातच रिक्षाचालकाला कानफटवलं, VIDEO

BJP MLA Parag Shah Slaps Auto Rickshaw Driver: घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहा यांनी भररस्त्यात रिक्षा चालकाला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नियम मोडल्यास आमदारांना कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

घाटकोपर येथे भाजप आमदार आमदारांकडून रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना समोर आली आहे . काल पराग शहा यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावली असून त्यास शिवीगाळ केल्याचे ही व्हिडीओ मध्ये दिसत आहे . वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार व अनधिकृत फेरीवाल्या विरोधात आमदार पराग शहा यांनी घाटकोपर येथे आंदोलन केले गेले होते. त्यावेळेस हा रिक्षा चालक हा विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्यामुळे आमदार पराग शाह यांनी त्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार हा समोर आला हा व्हिडीओ वायरल झाल्याने जर रिक्षा चालकाने नियम मोडला असेल तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहे का? असा सवाल स्थानिक विचारात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com