पुण्यात भयंकर घडलं! रिक्षा चालकाने डोंगरावर आयुष्य संपवलं; नेमकं कारण काय?

Rickshaw Driver Ends Life in Sus Village Hills: पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुस गाव परिसरातील डोंगरावर एका व्यक्तीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
Rickshaw Driver Ends Life in Sus Village Hills
Rickshaw Driver Ends Life in Sus Village HillsSaam Tv Marathi
Published On

गोपाळ मोटघरे, साम टिव्ही

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुस गाव परिसरातील डोंगरावर एका व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गळफास घेतलेला व्यक्ती हा रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय साधारण ४० ते ४५ पर्यंत असल्याची माहिती आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालक असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी मृत व्यक्ती पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सुस गाव परिसरातील डोंगराळ भागात गेला. डोंगरावर चढून त्यानं आयुष्याचा दोर कापला.

Rickshaw Driver Ends Life in Sus Village Hills
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाला अटक, मारहाण प्रकरण भोवलं

झाडाला गळफास लावून रिक्षा चालकाने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गळफास घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह थेट शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. रिक्षा चालकाने नेमकी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Rickshaw Driver Ends Life in Sus Village Hills
मैत्रिणींसोबत पिकनिकला गेली, हायवेवर पोलीस महिलेने बेधुंद डान्स केला, VIDEO मुळे उडाली खळबळ

पुढील तपास पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कायदेशीर करणार आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com