Badlapur BJP Meeting News : भाजपच्या बैठकीत गोंधळ, आमदार आणि माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? VIDEO

Badlapur BJP Meeting update : बदलापुरात भाजपच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळाला. आमदार किसन कथोर आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.

बदलापूर : बदलापूरमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बदलापूरमध्ये भाजपच्या अंतर्गत बैठकीत गोंधळ पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये भाजपची बैठक झाली. या बैठकीला भाजप आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांचे समर्थकांनी हजेरी लावली होती.

या बैठकीत आमदार किसन कथोरे आणि माजी खासदार कपिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत हा प्रकार घडला. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांच्या गोंधळामुळे निरीक्षकांना बैठकच रद्द करावी लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com