Mihir Kotecha News : माझ्या जीवाला धोका, मिहीर कोटेचा यांचा खळबळजनक दावा; निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

BJP Mihir Kotecha Write Letter To Election Commission : भाजपचे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Mihir Kotecha
Mihir KotechaSaamTv
Published On

आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करणारं एक पत्र भाजपचे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी निवडणूक आयोगाला आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिहीर कोटेचा यांनी केलेल्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

कोटेचा यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) एस. चोक्कलिंगम यांना त्यांनी हे पत्र लिहिले असून त्यात त्यांच्या सुरक्षेचा भंग करण्याचा आणि त्यांच्या जीवाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे. त्याचबरोबर सदर प्रकरणी कारवाईची मागणी देखील या पत्रातून केली आहे.

Mihir Kotecha
Court News : सूनेला टीव्ही बघू न देणे, शेजाऱ्यांशी बोलू न देणे क्रूरता नव्हे; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी

पत्रात म्हंटले आहे की, तीन अज्ञात इसमांनी माझ्या जीवाला हानी केली, तसेच सुरक्षेचा भंग केला. शुक्रवारी दिवसाचा प्रचार संपल्यावर मुलुंड पश्चिम येथील हॉटेलमध्ये जेवण करत होतो, त्यावेळी ही घटना घडल्याचं कोटेचा यांनी पत्रात नमूद केलं आहे. पुढे त्यांनी म्हंटलं आहे की, पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर या कारमध्ये तीन संशयास्पद व्यक्तींनी येऊन माझ्या सुरक्षा पथकाला मी त्यांना फोन करून भेटायला बोलावले असल्याचे सांगितले. माझ्या सुरक्षा रक्षकांनी चौकशी केली तेव्हा त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव नितीन भाई असल्याचे सांगितले.

Mihir Kotecha
Supriya Sule News : बहिणींनी लोकसभेत दणका दिला, म्हणून त्या लाडक्या झाल्या; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

मात्र, मी कोणालाही फोन केलेला नव्हता. तेच मी माझ्या सुरक्षा रक्षकाना सांगितले. पण माझा ठावठिकाणा त्यांना कसा कळला या विचाराने मला धक्का बसला, यापूर्वी लोकसभेला देखील माझ्यावर अनेक वेळा हल्ला झाला आहे. माझ्या बॅक ऑफिसवरही हल्ला करण्यात आला. दोनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. म्हणून माझे विरोधक पुन्हा एकदा माझ्या जीवाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे असा मला संशय आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं मिहीर कोटेचा यांनी पत्रात म्हंटलं आहे. हे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनाही कोटेचा यांनी पाठवलं आहे.

Mihir Kotecha
Jayant Patil: संपूर्ण महाराष्ट्र भाजपविरोधात; वोट जिहादच्या विधानावरून जयंत पाटलांनी फडणवीसांना दाखवला आरसा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com