कराडकरांना Good News; मुंबई-कोल्हापूरचा प्रवास सुसाट होणार

Karad Traffic News : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गावरील कराडजवळील ३.४७ किलोमीटर लांबीचा भव्य उड्डाणपूल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. ११५ खांबांवर उभारलेल्या या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
Karad Flyover
Karad Flyover saam
Published On

Pune-Bengaluru Expressway Updates : पुणे-बेंगळुरू आशियाई महामार्गावर कराडजवळ साडेतीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. सध्या या पुलाचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. कराडमधील वाहतूक कोंडीमुळे कोल्हापूर-पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता; आता तो त्रास कमी होणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. ११५ पिलरवर (खांबांवर) उभारलेल्या या भव्य पुलाची लांबी ३.४७ किलोमीटर, तर रुंदी २९.५ मीटर आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पुणे-बेंगळुरू प्रवास अधिक गतिमान होणार आहे. त्याचबरोबर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासोबतच वाहनधारकांच्या इंधनाचीही बचत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com