Bhiwandi News: गाड्या लावून रस्ता अडवला, दारुड्यानं तलवार उपसत माजवली दहशत|VIDEO

Crime News Bhiwandi: राज्यात दिवसागणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना आता थेट कोयते, तलवारी हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार भिवंडी येथे घडला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात एका समाजकंटकाणे भर रस्त्यात नंग्या तलवारी हातात घेत दहशत माजवून थेट कायद्याला आव्हान दिले. देविदास बाळाराम पाटील असे या गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी समाजकंटकाच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दरवर्षीप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संगीत आणि बॅंड वाद्याचा कार्यक्रम भिवंडी येथील खोणी गावात सुरू होता.त्यावेळी कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची गर्दी जमलेली असताना आरोपी देविदासने दुचाकीने कार्यक्रमस्थळाच्या जवळून जाताना यांनी रोड बंद केला तो यांच्या बापाचा आहे का?असे बोलून जातीवाचक शिवीगाळ करुन निघून गेला. त्यानंतर पुन्हा घरून हातात दोन तलवारी घेऊन चालत येत हवेत फिरवून कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थितांवर तलवारीने हल्ला करून दहशत पसरवली.त्यावेळी उपस्थितांनी तेथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचवला. सदर घटनेमुळे भिवंडी परिसरात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीवर कडक कारवाईची मागणी नागरिक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com