भक्ती-संस्कृतीचा अनोखा संगम; दुर्गा काली माता देवीला ६० डझन आंब्यांचे आरास

bhandup news : भांडुपमध्ये भक्ती-संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. दुर्गा काली माता देवीला ६० डझन आंब्यांचे आरास करण्यात आलीय.

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबईच्या भांडुप पश्चिम परिसरात भक्ती, उत्साह आणि जल्लोषाचे अनोखे वातावरण पाहायला मिळतंय. श्री दुर्गा काली माता मंदिराचा २५ वा वर्धापन दिन अर्थात रौप्य महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय. या रौप्य महोत्सवानिमित्त मंदिर परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघालाय.

देवीच्या मूर्तीच्या आजूबाजूला तब्बल ६० डझन आंब्यांचे आरास करण्यात आली आहे. ही अनोखी सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतेय. याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात जत्रेचे आयोजन करण्यात आलंय. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांमुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झालंय. विशेष बाब म्हणजे मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी येथे मोफत स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. त्यामुळे स्थानिक उद्योजकांनाही आपल्या व्यवसायाला चालना देण्याची संधी मिळतेय . या मंदिरात रौप्य महोत्सव भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com