समाज माध्यमांवर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अखेर काही तासांतच धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
या घटनेवर धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि मंत्री पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जेव्हा पासून मी मंत्री पदाची शपथ घेतली आहे, तेव्हापासून वेळोवेळी या प्रकरणावर मी व्यक्त होत आहे. हा विषय माणुसकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर आहे. काल समोर आलेले फोटो मी समाजमाध्यमांवर पाहिले, परंतु ते पूर्णपणे पाहण्याची माझी हिंमत झाली नाही.
त्या पुढे म्हणाल्या, ज्या लोकांनी इतक्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ बनवला, त्यामध्ये जी निर्दयता आहे, ती माझ्यात नाही. मी 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. तपास यंत्रणांनी सत्य समोर आणले पाहिजे. गुन्हेगार कोणत्याही जात-धर्माचा असो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो.
पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांची माफीही मागितली. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे मी स्वागत करते. हा राजीनामा आधीच व्हायला हवा होता आणि त्यांनी मंत्रीपदाची शपथही घ्यायची नव्हती, असे मी मानते. मात्र ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणत त्यांचा राजीनामा योग्य पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले."
पत्रकारांनी याप्रकरणी अधिक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, पंकजा मुंडे त्या ठिकाणाहून निघून गेल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.