दिवगंत संतोष देशमुखांच्या घरात मध्यरात्री घरफोडी; कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना चोरट्यांची एन्ट्री

Santosh deshmukh News : दिवगंत संतोष देशमुखांच्या घरात मध्यरात्री घरफोडी केल्याचं समोर आलं आहे. कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना देशमुखांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झालं आहे.

बीडच्या मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मध्यरात्री घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय. रात्री घरात दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले होते. तयावेळी हा प्रकार घडला आहे. सकाळी उठल्यानंतर हा संपूर्ण प्रकार लक्षात आलाय. त्यानंतर देशमुख कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मस्साजोगमध्ये केज पोलिसांसह बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालीये. देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोग गावात आणखी काही ठिकाणी घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com