Beed News: बैल नसल्याने जु खांद्यावर घेऊन शेतकऱ्याने केली कोळपणी, लातूरनंतर बीडमधील शेतकऱ्याचा VIDEO व्हायरल

Emotional Video Farmer Ploughing With Shoulder: बीड जिल्ह्यातील भटुंबा येथील शेतकरी नामदेव मोरे यांनी बैलजोडी नसल्याने स्वतःच्या खांद्यावर जु घेत शेती केली. त्यांच्या या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मदतीची मागणी जोर धरत आहे.

शेतीसाठी आवश्यक असलेली बैलजोडी नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील भटुंबा येथील शेतकऱ्यावर जु आपल्या खांद्यावर घेऊन कोळपणी करण्याची वेळ आली आहे. नामदेव मोरे असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोरे आपल्या खांद्यावर जु घेऊन शेतात कोळपणी करताना दिसत आहेत, तर त्यांच्या पत्नी त्या कोळपणीच्या प्रक्रियेत त्यांना मदत करताना दिसत आहेत. ही घटना समोर येताच अनेकांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया दिल्या असून, शासनाच्या यंत्रणांनी अशा गरजू शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ मदत पोहोचवावी, अशी मागणी होत आहे. याआधी लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानेही अशीच कोळपणी बैलाऐवजी स्वतःच्या खांद्यावर जु घेऊन केली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याला मदतही मिळाली होती. आता बीडच्या नामदेव मोरे यांनाही तत्काळ मदत मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com