Badlapur News: चक्क आमदारांनेच सांगितला ड्रग्जचा अड्डा, ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल बापरे...VIDEO

Drugs Sold Openly in Tea Stall: बदलापूर शहरात पान टपरी, चहाच्या टपरीवर ड्रग्स विक्री केली जात असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भातलं वक्तव्य केले.

बदलापुर शहरातील पान टपरी, चहाच्या टपरीवर ड्रग्स विक्री केली जाते असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अनेकदा मी स्वतः पोलिसांना सांगून कारवाई करायला लावली आहे. या ड्रग्सच्या विळख्यात कॉलेजचे तरुण-तरुणी सहजपणे अडकतात. बाहेरून आलेले लोक हे विक्री करतात. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला हवी असं कथोरे यांनी म्हंटलय. दरम्यान कथोरे यांच्या या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असल्यामुळे सरकार आणि पोलीस प्रशासन नेमके करते काय आहे असा सवाल उपस्थित होत आहे. ड्रगच्या विळख्यात तरुणाई अडकल्याने देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाची गंभीररीत्या सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com