Badlapur News : बदलापूरमध्ये आंदोलकांकडून पोलिसांवर दगडांचा वर्षाव, महिला जखमी, पाहा VIDEO

Badlapur minor school girl abuse case Citizen protest : बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या आंदोलनप्रकरणी जमाव रस्त्यावर उतरला आहे. जमावाने केलेल्या दगडफेकीत कार्यकर्ता महिला जखमी झाल्याचं समोर आलंय.

मुंबई : चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूरमध्ये वातावरण तापलंय. आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. रेल रोको, उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आलीय. हजारोच्या संख्येने रस्त्यावर असलेल्या जमावाने आता आक्रमक पवित्रा घेतलाय. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केल्याचं समोर आलंय. या दगडफेकीत एका महिला कार्यकर्त्याच्या डोक्याला मारहाण झाल्याचं आता समोर आलंय.

घटनास्थळी पोलीस आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत. आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांची आहे. दगडफेकीदरम्यान एका आंदोलक महिलेला दगड लागला. डोक्यातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. दगडफेकीत अनेकजण जखमी होत असल्याचं दिसत आहे. याअगोदर एका महिलेला भोवळ आली होती, त्यानंतर आता हा प्रकार समोर आलाय. आंदोलनकर्ते आणखीनच आक्रमक होत असल्याचं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com