अयोध्येत मंदिराच्या नावाने स्वतःच्या जमिनी घेतल्या; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Targets BJP: अयोध्या मंदिर जमिनीचे व्यवहार आणि निधीतील अनियमिततेशी संबंधित आरोपांवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नागपूरमधील 'रामरक्षा' कार्यक्रमात बोलताना, सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राम मंदिरात चोरी झाली आहे. अयोध्येत मंदिराचा नावाने स्वतःच्या जमिनी घेतल्या.मंदिरात दरोडा टाकला असताना उत्तर प्रदेश विधान सभा अध्यक्ष म्हणतात, श्रद्धेने पैसे दिले नाही ते चोरीला गेले. या चोरी प्रकरणी तेथील अनेकजण, साधू आहे ते संताप व्यक्त करत आहेत. मंदिर लुटीचा विषयाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत सोडणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला गंभीर इशारा दिलाय. शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीने आज नागपूरमध्ये रामरक्षा करण्यात आलं. यावेळी येथील रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com