पंढरपूरच्या अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. अंजनगावात छत्रपती शिवरायांचा पुतळा देणारे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील यांना अटक करण्यात आली आहे. दंगल घडवून आणणे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवारे यांच्या विरोधात एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना माढा न्यायालयापुढे हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अंजनगाव येथे बेकायदेशीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाईला सुरुवात केली आहे. अंजनगावात एक एप्रिल रोजी खेलोबा देवस्थानच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.