Vanchit News: वंचितला फंडिंग? यशोमती ठाकूर यांच्या गंभीर आरोपावर आनंदराज आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया 'साम'वर EXCLUSIVE

Amravati Lok Sabha Election News: नवनीत राणा यांनी वंचितला आणि आनंंदराज आंबेडकरांना फंडिंग केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता.

अमरावती : यशोमती ठाकूर यांनी केलेलं वक्तव्य मुर्खपणाचं आहे, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय. यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांनी वंचितला आणि आनंंदराज आंबेडकरांना फंडिंग केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यावर आनंदराज आंबेडकर यांनी साम टीव्ही एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. यशोमती ठाकूर यांच्या आरोपात कोणतंही तत्थ नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आनंदराज आंबेडकर यांच्या हॉटेलची बिलं राणांनी भरली, असा सनसनाटी आरोप यथोमती ठाकूर यांनी केला होता. त्या आरोपांवर आनंदराज आंबेडकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं त्यांनी सामशी बोलताना काय म्हटलं, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. वंचितने अमरावतीत उमेदवार दिला नसून आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आनंदराज आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com