Amol Kolhe | हनुमाची शेपटी आणि रावणाचा दाखला देत अमोल कोल्हेंची सरकारवर टीका

प्रभू श्रीरामावर असलेल्या हनुमानाच्या निष्ठतेबाबतचा रामायणातील दाखला देत शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय.

Amol Kolhe On Opposition | प्रभू श्रीरामावर असलेल्या हनुमानाच्या निष्ठतेबाबतचा रामायणातील दाखला देत शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. "तेव्हा रावणाने हनुमानाला शेपटी पेटवतो म्हणून भीती दाखवली होती तशीच आज सरकारकडून भल्या भल्या नेत्यांना कारवाईची भीती दाखवली जाते. तेव्हा हनुमंतरायाने रावणाची बाजू घेतली नाही, हनुमाची शेपटी रावणाने पेटवली आणि त्याच पेटत्या शेपटीची मशाल करून रावणाची संपूर्ण सोन्याची लंका जाळून टाकली, परंतु आज निष्ठा ठेवली जात नाही. जर निष्ठा ठेवली तर समोरून दबाव टाकणाऱ्यांची लंका दहन झाल्याशिवाय राहणार नाही" अशा शब्दात कोल्हेंनी शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारची लंका आता आपल्याला दहन करायची असं म्हणत सरकारवरती सडकून टिका केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com