Amit Thackeray: शिवरायांच्या बाजूला PM मोदींचा फोटो कशाला?, संतप्त झालेल्या अमित ठाकरेंनी काढायला लावला फोटो; पाहा VIDEO

Amit Thackeray ON PM Modi: शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पीएम मोदी यांचा फोटो पाहून मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी हा फोटो काढून टाकण्यास सांगितला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर असून ते चांगले संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. अमित ठाकरे यांनी आज पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी अमित ठाकरे यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाऊन त्यांना विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवरून जाब विचारला. मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता हे पाहून अमित ठाकरे संतप्त झाले. शिवाजी महाराजांशेजारी पंतप्रधानांचा फोटो कशाला कशाला? असा जाब त्यांनी मुख्याध्यापकांना विचारला आणि आपल्या कार्यकर्त्यांना पीएम मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले.

आज सकाळी अमित ठाकरे यांनी पुण्यातील शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी वसतिगृह येथील स्वच्छतागृह येथे असलेली अस्वच्छता, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तसेच महाविद्यालयातील मेसमध्ये आढळून येणाऱ्या आळीचे फोटो विद्यार्थ्यांनी त्यांना दाखवले. तसेच कॅन्टीनमध्ये सडलेले कांदे पाहून अमित ठाकरे हे आक्रमक झाले आणि त्यांनी तेच सडलेले कांदे प्राध्यापक यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि जर विद्यार्थ्यांना येथे आजच्या आज चांगल्या सोयी सुविधा तसेच चांगल जेवण मिळालं नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com