Amit Shah: मणिपुरमधील राष्ट्रपती राजवटीच्या प्रस्तावावर अमित शाहांचं भाष्य,VIDEO

Manipur Violence : माणिपूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा हिंसाचार सुरू आहे, यावरच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी भाष्य केले आहे.

मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाने देखील मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिला आहे. यावरूनच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाष्य केले आहे. अमित शहा म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर जातीय हिंसा भडकली. या दंगली नाहीत किंवा दहशतवाद नाही उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा अर्थ लावण्यावरून दोन समुदायांमध्ये जातीय हिंसा झाली.

सर्वांनी यावर चिंता देखील व्यक्त केली आहे. मणिपूरात गेल्या चार महिन्यापासून हिंसाचार झालेला नाही. मणिपूरमधील परिस्थिती आता समाधानकारक आहे असे मी म्हणणार नाही. पण ती नियंत्रणात आहे. काँग्रेसकडे इतके खासदार नाहीत किती अविश्वास प्रस्ताव मांडतील मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व शक्य तितके पावले उचलत आहे. अमित शाहा पुढे म्हणाले की, मणिपूर हिंसाचारात 260 लोकांचा मृत्यू झाला आहे. तिथे औषध आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. टेक्निकल वैद्यकीय शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. प्राथमिक शिक्षणासाठी वर्ग लावले आहेत. जातीय हिंसा होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात. याला पक्षाशी जोडू नका मणिपूरमध्ये 1993 साली कुकी नागा यांच्यात जातीय संघर्ष झाला हा संघर्ष पाच वर्ष सुरू राहिला पुढे एक दशक छोट्या मोठ्या घटना सुरू होत्या. आम्ही असे नाही म्हणत की तुमच्या काळात जास्त झाला आमच्या काळात कमी झाला पण हिंसा व्हायला नको असे अमित शाहा म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com