Sangli News: रुग्णांच्या जीवाशी खेळ, रुग्णवाहिका आली पण ब्रेकच लागेना; आरोग्य विभागाचा गलथान कारभार|VIDEO

Shocking! Ambulance Arrives but Can't Move : राज्यभरात आरोग्य विभागाचे तीन तेरा तर वाजलेच आहे, आता तर रुग्णवाहिकांचा ब्रेक लागत नसल्याने आरोग्य विभाग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खंबाळे भाळवणी येथे एक चारचाकी आणि दुचाकी मोटरसायकलमध्ये अपघात घडला. विटा कुंडल रोडवरील हा अपघात खंबाळे येथील ग्रामस्थांनी बघितल्यानंतर तातडीने त्यांनी 108 या नंबर वर फोन केला. काही वेळानंतर ॲम्बुलन्स अपघात स्थळी आली परंतु ही ॲम्बुलन्स या ठिकाणी आल्यानंतर सदर गाडीचा स्टार्टर लागत नव्हता. आणि स्टार्टर लागला तर गिअर पडत नव्हता. गाडीचा ब्रेक लागत नसल्याने अक्षरशः हा पाठीमागील चाकात दगड लावून ॲम्बुलन्स थांबवण्यात आली होती.

या प्रकारानंतर खंबाळे गावातील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. एखाद्या रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असताना अशा गाड्या पाठवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग आरोग्य विभागाने सुरू केला आहे. याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com