Girish Mahajan Video : गिरीश महाजनांनी मतदारसंघातून ठोकली धूम; व्हिडिओ व्हायरल

Ambadas Danve : विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरून शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मिडियावरून शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील दौऱ्याचा हा व्हिडिओ आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महाजन जळगाव जिह्यातील लिहा तांडा गावात गेले होते. जामनेर मतदारसंघातील तरुणांनी खराब रस्त्यांबाबत रोष व्यक्त महाजन यांना जाब विचारला, सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने विकासाच्या गप्पा मारणाऱ्या शिंदे आणि भाजपच्या दाव्यांची पोलखोल झाली असे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हंटल आहे.

मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात अतिशय गलिच्छ रस्ते पाहायला मिळाले आहेत. महाजन लिहा तांडा गावात गेले होते. गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी तिथून पळ काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com