अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाविरोधात 'पॉक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे व्हॅनने शाळेत जात असताना चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला. घरी परतल्यानंतर पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
मांडवा सागरी पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.