'तुमची एवढी डेअरिंग वाढली...' अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला दिली तंबी, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar Questions DSP Anjali Krishna: अजित पवारांचा महिला पोलीस अधिकाऱ्याशी संवाद असलेला व्हिडिओ व्हायरल. “तुमची एवढी डेअरिंग वाढली का?” असा थेट सवाल उपस्थित.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिला पोलीस अधिकाऱ्याला तंबी देतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. अजित पवार आणि सोलापूरच्या माढा तालुक्यातील डेप्युटी एसपी अंजली कृष्णा यांच्यात बातचीत झालेला व्हिडिओ समोर आला आहे.

माढा मुरूम उत्खनन प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यानं कारवाईला सुरूवात केली होती. कारवाई रोखण्याबाबत अजित पवारांनी त्यांना फोन केला होता. अजित पवारांनी कारवाई रोखण्याच्या सूचना दिल्यानंतर महिला आयपीएस अधिकाऱ्याने दुसऱ्यांच्या नसून माझ्या फोनवर कॉल करायला हवा होता, असं सांगितले. यानंतर अजित पवार संतापले. 'तुमची एवढी डेअरिंग वाढली का?', असा सवाल त्यांनी विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com