Ajit Pawar VIDEO: अजित पवारांची Piyush Goyal यांच्याकडे 'ही' मोठी मागणी

Ajit Pawar News: राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठक संपन्न झाली, यादम्यान अजित पवार यांनी पीयूष गोयल यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

राज्यात कांदा प्रश्नावरुन वातावरण चांगलच तापलं आहे. यादरम्यान काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करु नका असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार राज्यस्तरीय महायुती पदाधिकारी बैठकीत बोलत होते यादरम्यान त्यांनी पीयूष गोयल यांना हे आवाहन केलं आहे. कांद्याने अनेक जनांना रडवलं असल्याचं ते म्हणाले. कांद्यामुळेच नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि सोलापुर जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा निर्यातबंदी करण्यात आली. त्याची मोठी किंमत आपल्याला भोगावी लागली असं म्हणत कांदा निर्यात बंदी करु नका अशी मागणी अजित पवार यांनी पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com