Ajit Pawar Medha Kulkarni dispute
Ajit Pawar Medha Kulkarni disputeSaam TV News

Ajit Pawar : महायुतीत नाराजीनाट्य, भाजप खासदार येण्याआधीच अजितदादांनी केले उद्घाटन

Ajit Pawar Medha Kulkarni dispute : पुण्यात अजित पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी येण्याआधीच उद्घाटन केल्याने नाराजीचं नाट्य निर्माण झालं. महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर.
Published on

Ajit Pawar Medha Kulkarni : पुण्यामध्ये महायुतीमधील नाराजीनाट्य समोर आलेय. अजितदादा पवार यांनी खासदार येण्याआधीच उद्घाटन केल्यामुळे नाराजीनाट्य समोर आलेय. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांच्याकडून अनेक विकासकामाचे उद्घटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यावेळी मुंबईत हजर राहण्यासाठी दादांकडून पुण्यात नियोजित वेळेआधीच कार्यक्रम आटोपण्याचा धडाका सुरू होता.

खासदार मेधा कुलकर्णी या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. अजित पवार यांनी मला माहिती नव्हतं, असं उत्तर दिल्यानंतर मेधा कुलकर्णी असं कसं माहिती नव्हतं असे उत्तर दिले. त्यावर यानंतर पुन्हा अजित पवार यांनी इमारतीचे उद्घाटन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com